Total Pageviews

Tuesday 3 October 2017

माझा पहिला ब्लॉग



रात्रीचे 1 वाजलेले, बर्याच दिवसांपासून विचार करत होतो ब्लॉग लिहिण्याचा, पण वेळ भेटत नव्हता. ठरवले की आज ब्लॉग लिहायचाच.
पण आता विषय मिळत नव्हता.
भरपूर विचार आणी खाडाखोड़ केली, भरपूर पेपर आणी वेळ वाया घातल्यावर बघितले तर 3 वाजलेले.
विषय सापडण्याची वाट बघण्यापेक्षा झोपायचे ठरवले.
तेव्हढ्यात लक्षात आले की विषय तर सापडला...
"वाट"

तुम्ही, मी, आपण सर्वच वाट पाहतोय फ़क्त. वास्तवातून काहीतरी अवास्तव घडण्याची... आपण सर्वच.
जगतोय म्हणजे वाट पाहण. मान्य कुणीच करत नाही, कुणी करणारही नाही... आणी कुणाला माहीतपण नसत.
सर्वांनकडे पुरावे असतात जगाला दाखवायला. हे करायचय, ते होणार आहे.
पण नक्की काय हवय ते कधी कळतच नाही, कारण वाट बघणे कधी संपतच नाही.
बरेचदा आयुष्यात अचानक खूप उलथापालथ होते, मनात विचार येतो की संपल आता सगळ. शाश्वती सोबत अशाश्वती जोडुनच येते. पण हे संसारचक्र जाम हट्टी असते. या वाट बघण्याला ते पुरून उरते.
यात मधुनच एखादा वेडा येतोपण, संसाराचे नियम तोडून त्याला पाहिजे तसे जगतो आणी ही युगायुगांची वाट बघणार्यांची रांग पार करून सर्वांच्या पुढे निघूनपण जातो. पण हे असे जगणे सर्वांना जमत नाही आणी झेपत पण नाही. कारण वाट बघण सोप असत.
वाटच पाहतोय...पण कसली?
ते नाहीच माहीत!